पालघर मध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध, मुस्लिम समाजाचे मोठे आंदोलन

दि. २५, पालघर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. २५) पालघर शहरात समस्त मुस्लिम समाजाने जामा मशिदेच्या बाहेर निषेध आंदोलन केले. दुपारी २ वाजता शुक्रवारची नमाज पठण केल्यानंतर हे आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे, आणि त्यानुसार पालघरमध्येही मुस्लिम समाजाने या हल्ल्याच्या निषेधार्थ आवाज उठवला. आंदोलनकारांनी हातावर काळे फीत बांधून शहीद झालेल्या पर्यटकांप्रति श्रद्धांजली अर्पण केली आणि आपले दुःख व्यक्त केले. यावेळी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘पाकिस्तान वर कारवाई करा, गुन्हेगारांना शिक्षा द्या’ अशा घोषणा दिल्या गेल्या. आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज फाडून पेटवला आणि दहशतवाद्यांचा कायमचा नाश करण्याची मागणी केली.

या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाने आपल्या एकजुटीचा संदेश दिला आणि दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *