एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या वतीने तारापूर पोफरण येथे भव्य महिला मेळावा संपन्न


कार्यक्रमात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले, जसे की महिलांचे हक्क, वारसाहक्क, स्त्रीधन, बालविवाह प्रतिबंध, कौटुंबिक हिंसाचार, आणि सोशल मीडियाच्या योग्य वापराबाबत माहिती देण्यात आली. तसेच डॉक्टर वैभवी देशपांडे यांनी महिलांच्या आरोग्याविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले.

सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांवर भर
कार्यक्रमाच्या वेळी सेविकांनी पथनाट्याद्वारे स्त्रीभ्रूणहत्या थांबवण्याबाबत जनजागृती केली, तर बालकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उत्सवाला रंगत आणली. पाककृती व रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून आहार व योजनांबाबत जनजागृती करण्यात आली. गरोदर व स्तनदा मातांसाठी बाळंत विड्याचे वाटप व त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
महिलांनी आरोग्यदायी पोषणयुक्त पदार्थांचे प्रदर्शन भरवले, तर स्थानिक वारसा जपण्यासाठी पारंपरिक तारपा नृत्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन गौरी गोविंद धांगडा व रत्नमाला गायकवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निशिदा संखे व मनस्वी पाटील यांनी केले. यावेळी सहभागी महिलांना व बालकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.