पालघरमध्ये भाजपच्या नवीन जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

नेतृत्वाखाली पुढे सरकतोय ‘भाजप परिवार’, जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा निर्धार




पालघर : भारतीय जनता पार्टीच्या पालघर जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळा भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खासदार हेमंत सावरा, आमदार हरिश्चंद्र भोये आणि ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सांगितले की, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांमध्ये भाजपाने बहुमत मिळवून सत्ता स्थापन करणे हे प्राथमिक ध्येय असावे. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक नगरपालिकेत भाजपाचा नगराध्यक्ष निवडून यावा यासाठी आजपासूनच कार्याला लागा, असे आवाहन करण्यात आले.

नवीन जिल्हा कार्यालय हे केवळ कार्यालय नसून, हे पालघर जिल्ह्याच्या जनतेसाठी एक प्रभावी सत्ता केंद्र ठरेल. खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्ष हे स्वतः येथे उपस्थित राहून जनतेच्या अडचणी सोडवतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

भाजप हा एक कार्यकर्ता आधारित पक्ष असून, प्रत्येक कार्यकर्ता हा कुटुंबाचा सदस्य असल्याप्रमाणे स्वतः झोकून काम करतो. म्हणूनच भाजपा हा देशाचा विश्वासार्ह, प्रामाणिक आणि प्रगतिशील पक्ष म्हणून उदयास आला आहे.

महाराष्ट्रात भाजपाचे दीड कोटी सदस्य हे जनतेच्या भाजपावर असलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. या भूमिपूजनाच्या दिवशी, सर्वांनी देशहितासाठी आणि जनसेवेचा वसा पुढे चालवण्याची शपथ घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *