भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पालघर –भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सध्या पालघर लोकसभा संघटक म्हणून जबाबदारी सांभाळणारे नंदकुमार पाटील यांच्यावर गंभीर आरोप झाला आहे. जमिनीच्या वादातून एका महिलेला मारहाण केल्याचा आणि तिचा विनयभंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात वाडा पोलीस ठाण्यात नंदकुमार पाटील आणि त्यांच्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, जमिनीच्या वादावरून वाद झाल्यानंतर नंदकुमार पाटील यांनी मारहाण करताना तिचा विनयभंग केला. विशेष म्हणजे, मारहाणीदरम्यान महिला विवस्त्र झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दुसऱ्या सीसीटीव्हीमध्ये मारहाण होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजपच्या स्थानिक नेतृत्वासाठीही ही बाब अडचणीत आणणारी ठरू शकते. वाडा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *