मनोर येथील नऊ विद्यार्थ्यांना कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा ग्रीन हिल रिसॉर्ट येथे पालघर व ठाणे जिल्ह्यातील मार्शल आर्ट स्पोर्ट्स अकॅडमी ऑफ इंडिया या संस्थेतील 76 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या तीन दिवसीय निवासी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम घेतले होते.  परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून शिबिरात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना एस टी लुक्स हाईस्कूल बिलाल पाडा येथे आयोजित समारंभात प्रशिक्षक , पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत  ब्लॅकबेल्ट  प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यात मनोर मधून  वेदा पाटील, मोक्षदा भगत, उत्कर्षां ढोले, सक्षम बोरकर, शिवम भगत, तन्मेष भोईर, पुष्कर वरठा, नैतिक पाटील, हार्दिक पाटील, यांनी ब्लॅकबेल्ट मिळवला. यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कराटे प्रशिक्षक श्री अमर भोईर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख वक्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री चव्हाण सर विश्वनाथ कांबळे सर,  महेश भोईर सर व मार्शल आर्ट स्पोर्ट्स चे संस्थापक भाईदास देसले सर व चीफ एक्झामिनर कृपेश पाटील, अमर भोईर सर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *