एमडी टायर्स कंपनीत बॉयलरचा डिस्टेंस पाईप फुटल्याने पाच जण भाजले

वाडा तालुक्यातील कडूस औद्योगिक क्षेत्रातील वडवली गावात असलेल्या एमडी टायर्स कंपनीत आज सायंकाळी सुमारे ६ वाजता मोठा अपघात झाला. कंपनीत ऑइलचे उत्पादन सुरू असताना बॉयलरचा डिस्टेंस पाईप अचानक प्रेशर वाढल्याने तुटला, आणि त्यातून मोठ्या प्रमाणात प्रेशरयुक्त ऑइल मिश्रित आग बाहेर पडली.
अपघातात पाच जण भाजले
या दुर्घटनेत कंपनीत काम करणारे पाच जण गंभीर भाजले असून त्यांची ओळख खालीलप्रमाणे आहे :
1. तुफान कलसीम डामोर (वय 30 वर्षे) – अंदाजे 40% भाजले
2. रोशनी प्रवीण परमार (वय 26 वर्षे) – अंदाजे 50% भाजले
3. प्रेमा वसार (वय 27 वर्षे) – अंदाजे 50% भाजले
4. काजल प्रवीण परमार (वय 3 वर्षे) – अंदाजे 50% भाजले
5. आकाश प्रेम मसार (वय दीड वर्ष) – अंदाजे 55% भाजले

सर्व जखमी झाबुआ, मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत.
ठाणे येथे हलवले
जखमींना तातडीने श्री साईदत्त हॉस्पिटल, अंबाडी, ठाणे ग्रामीण येथे प्राथमिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे. त्यातील रोशनी परमार, प्रेमा वसार, काजल परमार आणि आकाश मसार यांना अधिक उपचारासाठी ठाणे येथे हलवण्यात आले आहे.
या दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे पालन होत आहे का? यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *