शिवसेना सचिन पाटील प्रथम उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर
आणि शिवसेना युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सुमित पिंपळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

पालघर: शिवसेना सचिन पाटील प्रथम उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर कुंभवली ग्राम पंचायत सदस्य आणि शिवसेना (युवा सेना) उपजिल्हा प्रमुख सुमित रमाकांत पिंपळे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
भाजप प्रवेशाच्या वेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.

सचिन पाटील,हे पालघर जिल्ह्यात तसेच सुमित पिंपळे हे कुंभवली ग्रामपंचायतीत सक्रिय असून, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक आणि राजकीय उपक्रम राबवले गेले आहेत.
या प्रवेशामुळे मुरबे,नांदगाव,आलेवाडी,कुंभवली आणि आसपासच्या भागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
पाटील आणि पिंपळे यांच्या समर्थकांनीही त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून, आगामी निवडणुकांमध्ये भाजपला याचा फायदा होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *