२० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला वाणगाव पोलिसांनी केली अटक

माहितीनुसार, आरोपी दद्दा जयचंद चिमाडा (रा. दादरा नगर हवेली) याने आपल्या साथीदारांसह एका कार्यालयात घुसून खंडणी मागितली होती. तसेच, ८,००० रुपये रोख, मोबाईल, एअर रायफल, पिस्तूल आणि अन्य मौल्यवान वस्तू लुटल्या होत्या. गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते.
गुप्त माहितीच्या आधारे अटक
४ मार्च २०२५ रोजी वाणगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. प्रभारी अधिकारी तुषार पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दादरा नगर हवेली येथे छापा टाकून आरोपीला अटक केली.
पोलिसांचे आवाहन
पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणत्याही संशयास्पद व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे.