पालघर जिल्ह्यातील बालकांच्या शिक्षण, आरोग्य व पाणीपुरवठ्यास प्राधान्य – पालकमंत्री गणेश नाईक

पालघर, दि. 05 – पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधत असताना बालकांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य आणि पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन समितीची बैठक आज सकाळी 11 वाजता लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे पार पडली. बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार ॲड. निरंजन डावखरे, आमदार राजेंद्र गावित, आमदार दौलत दरोडा, आमदार विलास तरे, आमदार विनोद निकोले, आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार स्नेहा दुबे-पंडित, आमदार राजन नाईक, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, MMRDAचे अति. आयुक्त राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांसह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या घोषणांचे संक्षिप्त विवेचन:

1. 2024-25 या वर्षासाठी 688.50 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद

प्रशासकीय मान्यता: 567.53 कोटी

वितरित निधी: 182.55 कोटी

उर्वरित निधी लवकरात लवकर खर्च करण्याचे निर्देश

2. 2025-26 साठी 696.08 कोटी निधी मंजूर

271.65 कोटी – सर्वसाधारण योजना

14.00 कोटी – विशेष घटक योजना

410.43 कोटी – आदिवासी घटक कार्यक्रम

3. आदिवासी भागांच्या विकासासाठी विशेष लक्ष

डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांसाठी प्रत्येकी 5 कोटी निधी

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना व शाळा दुरुस्तीला 68.06 कोटी

4. महत्वाच्या विकास योजनांना निधी मंजूर

महानगरपालिका व नगरपरिषदा: 88.58 कोटी

पेसा ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधा: 59.36 कोटी

महिला व बालविकास: 48.15 कोटी

पाटबंधारे: 38.65 कोटी

ऊर्जा विकास: 9.58 कोटी

पोलीस व तुरुंग सुधारणा: 8.15 कोटी

मत्स्यव्यवसाय: 4.80 कोटी

5. महाराष्ट्रात प्रथमच वैयक्तिक लाभ योजनांचे संकलन

नागरिकांसाठी सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार

पालकमंत्री गणेश नाईक यांनी सर्व यंत्रणांना निर्देश दिले की, जिल्ह्यातील नागरिकांना तातडीने सेवा मिळावी यासाठी प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडाव्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *