Boisar navrang 2025 : सर्कस ग्राउंडवर पहिल्यांदाच इंडोर गरबा, पावसाची चिंता नाही!

बोईसर : बोईसरकरांसाठी यंदाचा नवरात्रोत्सव खास ठरणार आहे. कारण, सर्कस ग्राउंड येथे पहिल्यांदाच ‘बोईसर नवरंग २०२५’ या नावाने इनडोअर गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दहा दिवसांत तब्बल पाच हजार तरुणाई गरब्याच्या तालावर थिरकणार आहे.

या उत्सवात लाइव्ह ऑर्केस्ट्रा, वुडन डान्स फ्लोअर, व्हीआयपी डान्स झोन, फूड कोर्ट, डेली प्राईजेस यांसह सेलिब्रिटी आर्टिस्टचे खास परफॉर्मन्स रंगणार आहेत. ‘हास्यजत्रा’ फेम कलाकार आणि यूपी स्टार्स हा देखील या महोत्सवाचा विशेष भाग असणार आहे.

आयोजकांच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमातून तरुणाईला मोबाईलच्या आहारी जाण्यापासून दूर ठेवून सांस्कृतिक संदेश देणे हा उद्देश आहे. सर्वपक्षीय नेते आणि ज्येष्ठ मान्यवरांचा सक्रिय सहभाग असल्याने हा उपक्रम राजकीय पक्षविरहित असून एकात्मतेचा संदेश देणारा ठरेल.

सुरक्षा व्यवस्था : संपूर्ण मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखरेख, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये, वैद्यकीय सुविधा तसेच आंतरिक सुरक्षेची विशेष काळजी आयोजकांनी घेतली आहे.

तिकीट बुकिंग : या सोहळ्यासाठी ऑनलाईन बुकिंगसह ऑफिसमध्येही तिकीट उपलब्ध आहेत. आयोजकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “मोफत पासची अपेक्षा न ठेवता प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी आणि या भव्य सांस्कृतिक उत्सवात सहभागी व्हावे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *