*बोईसर टपाल कार्यालयाकरीता जागा भाडेतत्त्वावर घेण्यासाठी*
*डाक विभागाकडे मोहोरबंद प्रस्ताव २७ ऑगस्टपर्यंत सादर करावे*

ही जागा भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून, उपलब्ध जागेचे क्षेत्रफळ, अपेक्षित भाडे, जागेचा संपूर्ण तपशील तसेच लागू असलेल्या अटी व शर्ती यांचा समावेश असलेले प्रस्ताव इच्छुकांनी सादर करावेत.
इच्छुक व्यक्ती, संस्था अथवा बिल्डर यांनी आपले प्रस्ताव २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत अधीक्षक डाकघर, पालघर विभाग यांच्या कार्यालयात सिलबंद पाकिटातून सादर करावेत.
प्रस्तावामध्ये जागेचे एकूण क्षेत्रफळ, अपेक्षित मासिक भाडे, जागेचे ठिकाण व इतर आवश्यक तपशील, तसेच जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील अटी व शर्ती असल्यास त्यांचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
अधिक माहितीसाठी अधीक्षक डाकघर, पालघर विभाग, मीरा रोड ४०११०७ येथे संपर्क साधावा . दूरध्वनी क्रमांक ०२२-२८११४२३२ असून, सोमवार ते शुक्रवार या दिवशी कार्यालयीन वेळेत माहिती घेता येणार आहे.
तसेच सब पोस्टमास्तर, बोईसर टपाल कार्यालय – ४०१५०४ यांच्याशी सोमवार ते शनिवार सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत संपर्क साधता येईल.

