मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस कुंभवलीत सामाजिक जाणिवेतून साजरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस कुंभवली गावात सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद व अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आणि त्यांच्याच हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला.

हा उपक्रम भाजप जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. सुमित पिंपळे यांच्या पुढाकाराने पार पडला. यावेळी पालघर पश्चिम मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रणय म्हात्रे , सुमित ठाकूर, चिराग संखे, कल्पेश व हर्षल पिंपळे, नितीन करणकाळे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

शिक्षणाविषयी प्रेम निर्माण करण्याचा समाजाभिमुख उपक्रम ग्रामस्थांनी कौतुकाने स्वीकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *