ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये भ्रष्टाचाराचा कळस पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची मागणी

ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत शिपाई संवर्गातून कनिष्ठ लिपिक या पदावर सध्या पदोन्नती भरती सुरु आहे. मात्र कार्यालयात कार्यरत कवळे आणि आहिर हे वरिष्ठ लिपिक गरीब शिपाई वर्गाकडून आदेश प्राप्त पाहिजे असल्यास सुमारे दोन ते तीन लाख रुपये लाचेची मागणी करीत आहेत. काही शिपायांनी पदोन्नतीचा आदेश मिळावा यासाठी कर्ज काढून पैसे दिले असून हा सर्व प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरु असल्याचा आरोप होत आहे. शिपाई नाईक पदासाठी पात्र कर्मचाऱ्याना सुद्धा दमदाटी करून वरिष्ठ लिपिक मनमानी करून पदोन्नतीसाठी पैशाची मागणी करीत आहेत. तसेच याबाबत बाहेर कुठे सांगू नये यासाठी धमकी दिली जात आहे. ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागात पदोन्नतीसाठी लाखो रुपये पैसे घेऊन नियुक्ती दिली जात असून ज्या गरीब कर्मचाऱ्याकडे पैसे नाहीत त्यांना पदोन्नती न देता मानसिक त्रास देऊन त्यांचे खच्चीकरण केले जात आहे.

