आमदारांच्या वाहनावरील लोगोचा गैरवापर? राजेंद्र गावित यांच्या चिरंजीवांच्या गाडीवर विधानसभा आमदाराचा लोगो

पालघर

महाराष्ट्र विधानसभा आमदारांसाठी वापरला जाणारा लोगो आता आमदारांच्या कुटुंबीयांच्या वाहनांवरही झळकताना दिसत असल्याने यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

पालघरचे माजी खासदार तथा शिवसेना नेते सध्याचे पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव आपल्या वाहनावर ‘महाराष्ट्र विधानसभा आमदार’ असा लोगो लावून फिरत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

विशेष म्हणजे, आमदारांच्या पदाचा किंवा शासकीय ओळखीचा गैरवापर होऊ नये, यासाठी शासनाकडून वाहनांवरील अशा प्रकारच्या चिन्हांबाबत नियम करण्यात आले असल्याचे सांगितले जात असताना आमदार पुत्राच्या वाहनावर हा लोगो कसा वापरला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

हा लोगो वापरण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे? आमदारांच्या कुटुंबीयांना त्यांच्या खासगी वाहनावर विधानसभा आमदाराचा लोगो लावता येतो का? आणि जर हा लोगो वापरणे नियमबाह्य असेल, तर संबंधितांवर कारवाई होणार का?
या प्रकरणी विधानसभा प्रशासन आणि राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *