बोईसर एमआयडीसीतील टेम्पो चालक-मालकांनी मनसे वाहतूक सेनेत प्रवेश घेतला; कॅमलीन नका येथे फलकाचे अनावरण

बोईसर, २६ जुलै २०२५ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांच्या प्रभावी विचारसरणीने प्रेरित होऊन, बोईसर एमआयडीसी परिसरातील अनेक टेम्पो चालक व मालकांनी नवनिर्माण वाहतूक सेनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. या निमित्ताने कॅमलीन नका येथे आज शनिवारी दुपारी १२.३० वाजता फलक अनावरणाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी वाहतूक सेनेच्या माध्यमातून खराब रस्ते, टोल वसुली, RTO नियम आणि ट्रान्सपोर्टर्सच्या गळचेपीविरोधात आवाज उठवणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रमुख उपस्थितीत आरिफ शेख, समीर मोरे – पालघर जिल्हा अध्यक्ष, भावेश चुरी – पालघर जिल्हा अध्यक्ष, धिरज गावड – विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष, चेतन पाटील – जिल्हा संघटक वाहतूक सेना, सिद्धेश महाले – कामगार सेना, उदय माने – जिल्हा संघटक सोजगार स्वयं रोजगार, आणि हमेश पाटील – तालुका अध्यक्ष यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *