ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये भ्रष्टाचाराचा कळस पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची मागणी

ठाणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अक्षरक्ष अनागोंदी कारभार सुरु आहे. बांधकाम विभागाच्या अतर्गत असलेल्या रस्त्यांची चाळण झाली असून निकृष्ठ कामांमुळे त्यामध्ये झालेला भ्रष्ट कारभार उघडा पडला आहे.  बांधकाम विभागाचे कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनले असून पदोन्नतीवर येणाऱ्या  कर्मचाऱ्याकडून लाखो रुपये घेतल्यानंतरच कामावर रूजू करून घेतले जात आहे.

ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत शिपाई संवर्गातून कनिष्ठ लिपिक या पदावर सध्या पदोन्नती भरती सुरु आहे.  मात्र कार्यालयात कार्यरत कवळे आणि आहिर हे वरिष्ठ लिपिक गरीब शिपाई वर्गाकडून आदेश प्राप्त पाहिजे असल्यास सुमारे दोन ते तीन लाख रुपये लाचेची मागणी करीत आहेत. काही शिपायांनी पदोन्नतीचा आदेश मिळावा यासाठी कर्ज काढून पैसे दिले असून हा सर्व प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरु असल्याचा आरोप होत आहे. शिपाई नाईक पदासाठी पात्र कर्मचाऱ्याना सुद्धा दमदाटी करून वरिष्ठ लिपिक मनमानी करून पदोन्नतीसाठी पैशाची मागणी करीत आहेत. तसेच याबाबत बाहेर कुठे सांगू नये यासाठी धमकी दिली जात आहे. ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागात पदोन्नतीसाठी लाखो रुपये पैसे घेऊन नियुक्ती दिली जात असून ज्या गरीब कर्मचाऱ्याकडे पैसे नाहीत त्यांना पदोन्नती न देता मानसिक त्रास देऊन त्यांचे खच्चीकरण केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *