लायन्स क्लब चिंचणी–तारापूरतर्फे नवरत्न पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला

समाजातील विविध घटकांचे योगदान हे सुसंस्कृत व समृद्ध समाज निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजातील अशा गुणी व्यक्तींना प्रोत्साहन देऊन इतरांना प्रेरणा देण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मनोज बाबूर यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ चिंचणी–तारापूर तर्फे आयोजित नवरत्न पुरस्कार वितरण समारंभ नुकताच तारापूर येथील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मनोज बाबूर यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, “आपण व्यवसाय किंवा नोकरीसह समाजकार्यासाठी वेळ दिल्यास समाजातील अनेक समस्या सोडवता येऊ शकतात. तसेच समाजाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी मोठे योगदान देता येते.” त्यांनी नवरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन करत त्यांना समाजासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सेकंड व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विकास सराफ यांनी लायन्स क्लब चिंचणी–तारापूरने राबवलेल्या विविध उपक्रमांचा गौरव करत, “या क्लबने डिस्ट्रिक्टमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अधिकाधिक लोकांनी या सामाजिक चळवळीत सहभागी होऊन सक्रिय भूमिका बजवावी,” असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष अंकित सावे होते. प्रास्ताविक माजी अध्यक्ष विजय सावे यांनी केले.
या सोहळ्याला माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. ख्वाजा मुदस्सर, रिजन चेअरपर्सन अतुल दांडेकर, झोन चेअरपर्सन सचिन गांधी, प्रमोद पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
चौकटीत…
नवरत्न पुरस्कार विजेते (विविध क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मानित):
1.दिनकर राऊत(D.K.Raut) – उद्योग क्षेत्र
2.मिलिंद केणी – वैद्यकीय क्षेत्र
3.रघुनाथ चौधरी – प्रशासकीय सेवा
4.विष्णू सावे – आधुनिक शेती
5.विवेकानंद करवीर – सामाजिक कार्य
6.स्नेहा सुनील सावे – परिचारिका सेवा
7.संदीप म्हात्रे – शिक्षण क्षेत्र
8.पार्णिका सुहास राऊत – कला क्षेत्र
9.विक्रांत के केणी– क्रीडा क्षेत्र
सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ .रूपाली पाटील व सौ.स्मिता सावे यांनी केले. या पुरस्कार सोहळ्यामुळे समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींना योग्य गौरव मिळून इतरांना प्रेरणा मिळाली, असे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
लायन सुनील वर्तक यांनी सर्वांचेआभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

