तारापूर मधील सडेकर कंपनीचे लाखो लिटर घातक रासायनिक सांडपाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदतीने साठवणूक
लाखो नागरिकांचे आरोग्यधोक्यात; प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली स्थानिक नागरिक करणार उग्र आंदोलन

तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी घटनास्थळी पाहणी करून चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानंतर सडेकर एनव्हिरो इंजिनिअर्स व्यवस्थापनाविरोधात बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तर पालघर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणी नुसार टाकी मधील बेकायदेशीर साठवणूक केलेले लाखो लिटर घातक रासायनिक सांडपाण्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले होते.
मात्र एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर देखील प्लॉट क्रमांक ड-८/१ च्या टाकी मधील घातक रासायनिक सांडपाण्याचा साठा अजूनही तसाच पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवली जात असून याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसत आहे.
घातक रासायनिक सांडपाण्याच्या लाखो लिटर साठ्यामुळे जवळच असलेल्या शिवाजीनगर या वस्तीमधील हजारो नागरिकांच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला गंभीर धोका पोहोचत असून रासायनिक सांडपाण्याची तातडीने विल्हेवाट न लावल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर नागरिक मोठा मोर्चाच्या माध्यमातून साठवणूक केलेले घातक रसायनिक केमिकल युक्त सांडपाणी हे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात फेकण्याच्या तयारीत असून याबाबत पत्रकारानी यानी सडेकर कंपनीचे मालक व प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ तारापूर मधील अधिकारी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.

