आषाढी एकादशी निमित्त चिंचणी पिंपळ नाका येथे उत्सवाची भक्तिमय सांगता

चिंचणी पिंपळ नाका – येथील पुरातन पेशवेकालीन विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक उत्साहात उत्सव साजरा करण्यात आला. विठ्ठल-रखुमाईची अभिषेक व महापूजा सौ. व . पियुष शंकर देसाई यांच्या हस्ते संपन्न झाली.

या प्रसंगी पंचक्रोशीतील वारकरी भजन, कीर्तन व दिंडीसह दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उत्सव ॐकार मित्र मंडळ चिंचणी पिंपळ नाका यांच्या वतीने उत्साहात पार पडला.

