बोईसर ग्रामपंचायतीविरोधात बेमुदत ठिय्या आंदोलनाची घोषणा
📍 जमुना टॉकिज रोड ते राहूल मेडिकल परिसरातील समस्यांकडे दुर्लक्ष

बोईसर | जमुना टॉकिज रोड ते राहूल मेडिकल परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आणि इतर अनेक मूलभूत समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ग्रामपंचायत बोईसरकडून केवळ पाहणी व आश्वासनांपलीकडे ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या संदर्भात वारंवार निवेदनं देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तर्फे दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ पासून बोईसर ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
पक्षाने ग्रामपंचायतीच्या उदासीनतेवर गंभीर आक्षेप नोंदवत, समस्यांचे निराकरण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीवरच राहील, असे पक्षाने इशारा दिला आहे.

